राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 10/12/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-1270/2024 बीएनएस कलम- 305(अ)331(4) प्रमाणे चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीची गोपनीय बातमीदारा मार्फत मा.पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाल्याने सदर गोपनीय माहितीच्या आधारे तर्क काढून संशयित अतिश नारायण धोत्रे वय 20 व जय विश्वास हिवाळे वय 19 रा- मुलंनमाथा ता.राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपासात कसून चौकशी केली असता सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांना 11/12/2024 रोजी अटक केली असून, रिमांड कालावधीमध्ये चोरीस गेलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या कलरच्या बकेट दिग्रस व राहुरी येथून हस्तगत करून,गुन्ह्यात वापरलेली आरोपीच्या नावावर असलेली बजाज पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपींनी पोलीस कस्टडी दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन गुरनं-1258/2024 हा मोबाईल चोरीचा दाखल गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर. ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे, विजय नवले, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे, नदीम शेख, आजिनाथ पाखरे, अमोल भांड, शेषराव कुटे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
राहुरी पोलिसांनी घरफोडी करून चोरी करणाऱ्या टोळीस केले जेरबंद, पोलीस कस्टडी दरम्यान डिग्रस व राहुरी येथून मुद्देमाल हस्तगत, पोलीस कस्टडी दरम्यान दोन गुन्हे उघडकीस

0Share
Leave a reply