Disha Shakti

क्राईम

चिंचोली फाटा येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी ब्राम्हणे यांनी आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न ; चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : शुक्रवार दि. 13 डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी घाटाजवळील जंगलात भाऊसाहेब ब्राम्हणे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरुन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले असून चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील भाऊसाहेब कचरु ब्राम्हणे (वय 67) हे 9 डिसेंबर रोजी सकाळी काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी दि. 12 डिसेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. परंतू शुक्रवार 13 डिसेंबर रोजी तालुक्यातील घोरपडवाडी घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरुन त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. भाऊसाहेब ब्राम्हणे हे सेवानिवृत्त बँक कर्मचारी होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेले 20 लाख रुपये व एक एकर जमीन नावावर करुन घेण्यासाठी त्यांचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून भाऊसाहेब ब्राम्हणे यांनी आत्महत्या केली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर पो.नि.संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलिस उप.नि.समाधान फडोळ, हवालदार सतीश आवारे, जानकीराम खेमनर, सुरज गायकवाड, राहुल यादव, सोमनाथ जायभाय, बाबासाहेब शेळके, अशोक शिंदे, पोलिस नाईक प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, रवी पवार, सतिष कुर्‍हाडे, थोरात, महिला पोलीस नाईक वृषाली कुसळकर श्रीरामपूर येथील मोबाईल सेलमधील पोलीस नाईक सचिन धनद, संतोष दरेकर, रामेश्वर वेताळ आदी पोलिस पथकाने या घटनेतील आरोपी वर्षा विशाल ब्राम्हणे, रा.चिंचोली, चंद्रकांत दादा मोहोळ, रा. फत्त्याबाद ता. श्रीरामपूर, सुनील उर्फ पिंट्या एकनाथ ब्राम्हणे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली. मात्र आरोपी राजेंद्र दगडू भोसले पसार झाला असून पथकाकडून त्याचा शोध सुरु आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरु आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!