Disha Shakti

सामाजिक

राहुरीत शनिवारी ख्रिस्त जन्मोत्सव सभा भविष्यवक्ता प्रोफेट मुन्ना यांचे होणार व्याख्यान; आराधना गीतांचा कार्यक्रम व समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : राहुरी शहरातील राजवाडा येथील क्रांती चौकात नाताळ व नववर्षनिमित्त ख्रिस्त जन्मोत्सव सभा व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी, (दि.२१) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक सामाजिक कार्यकर्ते पिंटूनाना साळवे यांनी दिली आहे.

यावेळी भविष्यवक्ता प्रोफेट मुन्ना यांचे व्याख्यान पार पडणार आहे. राहुरी तालुका पास्टर फेलोशिप, आराधना टीम (पा. रवि सरोदे), पा. दीपक थोरात, पा. अविनाश सरोदे यांचा आराधना गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने जय भीम मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमात समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा व पत्रकार बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास माजी आ. प्राजक्त तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, राहुरी तालुका मर्चंट पतसंस्थेचे चेअरमन भारत भुजाडी, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, पास्टर गोरख दिवे आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ख्रिस्त जन्मोत्सव सभेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पिंटूनाना साळवे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!