राहुरी प्रतिनीधी / आर. आर. जाधव : राहुरी तालुक्यातील जांभळी येथे दि.18/12/2024 बुधवारी रोजी सायंकाळी 05 वाजेच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी परतत असताना वावरथ येथील रहिवासी असलेला अनिकेत संजय बाचकर या तरुणाने वावरथ – जांभळी या परिसरालतील शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याची घटना समोर आली असून या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीस मोटारसायकल आडवी लावली व त्या तरुणीचा हात धरून तु मला आवडते माझ्या गाडीवर बस म्हणत गाडीवर बसवून त्या मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न केला असून त्या तरुणीने प्रसंगावधान दाखवत त्याचा हात हिसकावत मोठ्या मोठ्याने ओरडा ओरडा करत आपल्या घराच्यावस्तीकडे पळ काढला त्या ओढातानीत मुलगी खाली पडल्याने तीच्या हाताला मार लागला असता ते पाहून त्या तरुणाने तेथून धूम ठोकली त्या मुलीने रडत रडत घर गाठले असता तिच्या आई वडिलांनी तुला रडायला काय झाले याबाबत विचारले असता तिने आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.
सदरच्या प्रकाराने ती पीडित अल्पवयीन मुलगी घाबरुन गेल्याने तिच्या आई वडिलांनी दिनांक 19 डिसेंबर रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे येऊन त्या तरुणाविरोधात दिनांक 19/12/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-1295/2024 बीएनएस कलम- 137(2) , 62, 75 व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार 12 प्रमाणे विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तसेच यापूर्वीही हा तरुण पीडित तरुणी शाळेत जात येत असताना आपली मोटारसायकल आडवी लावत व पाठलाग करत होता मुलीच्या नातेवाईकांनी या तरुणाच्या पालकांना समज दिली परंतु समज देऊनही हा तरुणांमध्ये काहीच बदल न घडता या तरुणाने तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक समाधान फडोळ हे करत आहेत.
वावरथ जांभळी परिसरात शाळेतून येणाऱ्या मुलीचा विनयभंग करत अपहरण करण्याचा प्रयत्न, वावरथ येथील अनिकेत बाचकर या तरुणावर विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

0Share
Leave a reply