राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 21/12/2024 रोजीचे रात्री 00/45 वा.चे सुमारास नगर मनमाड हायवेवरील वांबोरी फाटा शिवारात राहुरी पोलिसांचे पो शि अंकुश भोसले व खेडकर यांचे पथक शासकीय वाहनाने रात्रगस्त घालत असताना वांबोरी फाटा येथे टाटा इंडिका कार चे बाजूला 5 इसम संशयास्पद रीतीने हालचाल करत असल्याचे दिसून आल्याने गस्तीवरील पथकाने त्यांना हटकन्यासाठी गेले असता सदर 5 इसम सैरभैर होऊन त्यापैकी दोघे नजीकच्या शेतात पळाले व तिघे इंडिका गाडीत बसू लागल्याने गास्तीवरील अंमलदार यांनी तात्काळ कार मध्ये बसणाऱ्या इसमाना समय सूचकता दाखवत कार सह ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन येथे त्यांच्या कार सह घेवुन आले
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता 5 ही आरोपी हे दरोड्याच्या तयारीने आलेले असल्याची कबूली ताब्यात घेतलेले तीन आरोपींनी दिल्याने पोलीस हवालदार जानकीराम खेमनर यांनी आरोपींच्या ताब्यातील कार पचां समक्ष चेक केल्यावर दरोड्याच्या तयारीस लागणारे साहित्य मिळुन आल्याने खात्री झाल्याने त्या बाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई अंकुश भोसले यांचे फिर्यादीवरून किशोर अर्जुन बर्डे वय 35 वर्ष, सुनील संजय निकम वय 27 वर्ष, अंबादास एकनाथ पवार वय 50 वर्ष सर्व राहणार पाण्याची टाकी विलद ता.नगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुध्द गुन्हा रजि नंबर 1299/2024 भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310 (5),प्रमाणे गुन्हा दाखल केला व आरोपींना दिनांक 21/12/2024 रोजी 11/07 वाजता अटक करून उर्वरित आरोपीचा शोध घेण्यासाठी 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांडची मागणी मा. न्यायालयात केली असता सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री गागरे यांनी बाजू मांडल्याने माननीय न्यायालयाने 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मा. न्यायालयाने दिल्याने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे व पो कॉ /इफ्तेखार सय्यद करत आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे , पोहेकॉ जानकीराम खेमनर, सुरज गायकवाड, राहुल यादव, अंकुश भोसले, संतोष राठोड, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, गणेश लिपणे,पो कॉ इफ्तेखार सय्यद, पोकॉ अविनाश दुधाडे पोकॉ लक्ष्मण खेडकर यांनी केली.
वांबोरी फाटा शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपीस राहुरी पोलिसांनी केले गजाआड गुन्ह्यासाठी वापरलेली कार व हत्यारे जप्त उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरू

0Share
Leave a reply