संगमनेर शहर प्रतिनिधी / धनेश कबाडे : गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन प्रणाली करण्याचे काम पुरवठा विभाग यांचे मार्फत सुरू असून ऑनलाईन करणे संदर्भात अनेक अडचणी उभ्या राहत आहेत दिवस दिवस साईट चालत नाही, अपुरे मनुष्यबळ, विज गेल्यानंतर पुरवठा विभाग येथे कोणतेही तत्सम साधने नाही, या सर्व गोष्टींना सामोरे जात सर्वसामान्य जनतेला आपले शिधापत्रिका ऑनलाईन करणे संदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते दिवस दिवस तिथे बसून राहवे लागत अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा रोज बुडवावा लागतो परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही कधी कधी मोकळ्या हाती जावे लागते महिलावर्ग अपंग वर्ग त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक अनेक व स्तरातील लोक त्या ठिकाणी दिवस दिवस तिथे बसलेले असतात.
संबंधित कार्यप्रणाली सुधारणे करणे बाबत मान्य तहसीलदार साहेब व पुरवठा निरीक्षण अधिकारी हे उदासीन दिसून येते असे लक्षात येते कारण इतके दिवस झाले अशी परिस्थिती असून यात कोणतीही सुधारणा झालेली नाही सदर परिस्थिती सुधारणा करण्याबाबत माननीय तहसीलदार साहेब तथा प्रांताधिकारी यांना वेळोवेळी विनंती पत्र विनंती देऊनही त्या संदर्भात माननीय प्रांताधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांनी कोणत्याही प्रकारे सुधारणेबाबत कार्यवाही केली नाही असे दिसून आले लवकरच याबाबत मान्य जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी नाशिक तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे याबाबत लवकरच लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे.
जर याबाबत अधिक सुधारणा न झाल्यास लवकरच शिवसेना माजी शहर प्रमुख अमर भाऊ कतारी यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल
इ शिधापत्रिका करणे संदर्भात ऑनलाईन प्रणाली मध्ये खूप अडचणी असल्या कारणास्तव ऑफलाइन प्रणाली तात्काळ सुरू करावी- अनुप म्हाळस

0Share
Leave a reply