दिशाशक्ती प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : सटाणा ता : २४ डिसेंबर 2024 रोजी इनएब्लिंग लीडरशिप व आर्मस्ट्रॉंग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरावरील फुटबॉल स्पर्धेत विजेत्या व उपविजेता संघातील खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात ज्यूनियर गटात आदर्श सुपरस्टार ए या विजेता संघातील खेळाडू-किमया विवेक खैरनार, मानसी किशोर माळी,श्रावणी श्रावण देवरे, राजलक्ष्मी चंद्रकांत बच्छाव, अर्णव भूषण पगार, भावेश प्रविण गांगुर्डे, संकेत कन्हैया नंदाळे, पुष्कर सचिन माळी तसेच आदर्श रॉकस्टार बी हा संघ उपविजेता झाला. उपविजेता संघातील खेळाडू-श्रद्धा प्रशांत सोनवणे, कल्याणी पंकज पवार, हंसिका रमेश प्रजापती, विघ्नेश अनिल सोनवणे, अवनीश रवींद्र भारती, आदित्य हेमंत शिवले, विज्ञेश अशोक पवार या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आले .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून म.वि.प्र समाज संस्थेचे चिटणीस दिलीप (भाऊसा) दळवी बागलाण तालुका डायरेक्टर डॉ.प्रसाद दादा सोनवणे,महिला संचालिका श्रीम. शालन ताई सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल दादा सोनवणे, अरुण दादा सोनवणे श्रीम. वैशाली सोनवणे श्रीम.अश्विनी निकम, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.अनिल जाधव, श्री.पोपट काशिराम खैरणार हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
श्री.दिलीप दळवी, डॉ. प्रसाद दादा व शालनताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सर्वांना मार्गदर्शन करणारे प्रगती फाउंडेशन इनएब्लिंग लीडरशिपचे आर्मस्ट्रॉंग यांच्या संयुक्त विद्यमाने कोच दिपक प्रजापती, प्रसाद सोनवणे, अनिकेत येवला , विशाल सनेर , केतन सूर्यवंशी, पराग सोनवणे यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. हर्षिता अहिरे व आभार श्रीम. सारिका कदम यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
म.वि.प्र.समाज, संचलित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेता व उपविजेता खेळाडूंचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

0Share
Leave a reply