पुणे प्रतिनीधी / प्रवीण वाघमोडे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. पोलीस तपासातून या प्ररणाबाबत खळबळजनक माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांची सुपारी त्यांच्या बायकोनेच दिली होती. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे समोर येत आहे. पोलीस तपासात या बाबी समोर आल्या आहेत. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे उद्योजक होते. ते सकाळी 9 डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. या दरम्या ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी रात्री सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकून सपासप 72 वेळा वार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरु होता.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्ये प्रकरणी त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याची तपासात निष्पन्न

0Share
Leave a reply