दिशाशक्ती विशेष / इनायत अत्तार : दिनांक 26/12/2024 रोजी सकाळी 08/00 वा. सुमारास मोरे हॉस्पीटल पाठील मागील मैदान, मोठाखांदा कामोठे ता. पनवेल, नवी मुंबई येथून अंदाजे सात वर्ष वयाचे एका बालकाचे काही अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाकरीता फुस लावून पळवून नेलेबाबत बालकाचे आईने दिलेल्या फिर्यादीवरुन कामोठे पोलीस स्टेशन नवी मुंबई येथे गुरनं. 322/2024 बी.एन.एस. कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने नमुद बालकाचा शोध होणकरीता नवी मुंबई पोलीसांतर्फे सर्व महाराष्ट्रातील पोलीस नियंत्रण कक्षांना कळविण्यात आले होते.
नमुद अपहृत बालक यास घेवुन अपहरणकर्ते हे अहिल्यानगर जिल्हयात येण्याची दाट शक्यता असलेबाबत मा. पोलीस अधिक्षक साो. अहिल्यानगर यांना मा.उप पोलीस आयुक्त रश्मी नांदेडकर, पनवेल नवी मुंबई यांनी कळविले होते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्हयात अपहत बालकाचा व अपहरणकर्ते यांचा शोध घेणेबाबत मा. पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी सर्व पोलीस ठाण्याना तसेच स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केले होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे नमुद अपहरणकर्ते हे संगमनेर रोडने नेवासेच्या दिशेने जात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन कडील पोसई/रोशन निकम, पोकों/संभाजी खरात, पोकों/ रामेश्वर तारडे, पोकों/अजित पटारे यांचे संयुक्त पथकांने नाकाबंदी तसेच पाठलाग करुन नमुद अपहरणकर्ते हे अपहृत बालकास घेवून जात असलेली इटींगा गाडी हि टाकळीभान ता. श्रीरामूपर येथे अडवुन त्यातील अपहृत बालकाची सुखरुप सुटका केली तसेच नमुद बालकास फुस लावुन घेवुन जात असलेले इसम नामे ।) विलास रामु इंगळे 2) अक्षय आबासाहेब म्हस्के 3) बाबासाहेब चिनप्पा पोळमाळी 4) कैलास रामु इंगळे. 5) प्रसाद गंगाधर कुटे सर्व रा. कुकाणा ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात येवुन त्यांना नवी मुंबई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अपहृत बालकाचे अपहरण झाल्यानतंर आठ तासाचे आत त्याची सुखरुप सुटका करण्यात अहिल्यानगर पोलीसांना यश आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्था.गु.शा. अहिल्यानगर, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोकों/ संभाजी खरात, पोका/रामेश्वर तारडे, पोकों/अजित पटारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथकाचे पोहेकों/शिंदे, पोना/ दरदले, पोका / शिरसाठ, पोका ससाणे तसंच अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपूरचे पोना/सचिन धनाड, पोकों/ रामेश्वर वेताळ यांनी केली आहे.
कामोठे नवी मुंबई येथुन अपहृत केलेल्या बालकाची अहिल्यानगर पोलीसांनी केली आठ तासात सुखरुप सुटका

0Share
Leave a reply