देगलूर प्रतिनिधी / धनाजी जोशी : श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांच्या अध्यक्ष पदी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर देगलूर तहसीलमध्ये संबंधित विभागांच्या कामामध्ये मोठी गती व पारदर्शकता दिसून आली आहे. संतोष पाटील यांनी या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा यासाठी अथक परिश्रम घेत देगलूर तहसीलच्या प्रत्येक गावात या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
देगलूर तहसीलमध्ये एकूण 659 फाइल्स तहसील कार्यालयाने व श्रावण बाळ योजना विभागाने प्राप्त केल्या होत्या. यामधून 652 फाइल्स मंजूर करण्यात आल्या आहेत, ज्यात संजय गांधी निराधार योजनेच्या 161 फाइल्स आणि श्रावण बाळ योजनेच्या 491 फाइल्स समाविष्ट आहेत.संजय गांधी निराधार योजनेची स्थापना 1980 मध्ये करण्यात आली होती, आणि 44 वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ लोकांना मिळालेला आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संतोष पाटील आणि सचिव तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही योजनांचे लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी संतोष पाटील यांची मेहनत आणि तात्काळ सहकार्य कौतुकास्पद ठरली आहे. यापूर्वी तालुक्यातील 1748 जणांच्या फाइल्स मंजूर झाल्या होत्या, आणि आता 652 नवीन फाइल्स मंजूर झाल्या आहेत. यामुळे आजपर्यंत एकूण 2404 फाइल्स मंजूर करण्यात आल्या आहेत.
संतोष पाटील यांनी या लक्षणीय यादी मंजूर करण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य घेतल्याचे आवर्जून सांगितले.
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनांच्या 652 फाइल्स मंजूर ; आजपर्यंत एकूण 2404 फाइल्स मंजूर

0Share
Leave a reply