नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगाव येथील भुमी पुत्र नागेश पाटील कल्याण यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा पालक सचिव नांदेड दक्षिण पदी निवडीचा ठराव मांडून निवड केल्याचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी सर यांच्या हस्ते देण्यात आले.
याबाबत अधिक वृत्त असे की, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी शहरातील सह्याद्री शासकीय विश्रमगृह येथे आयोजित बैठकीत नायगाव येथील भुमी पुत्र धडाडीचे पत्रकार दैनिक नवराष्ट्र नायगाव तालुका प्रतिनिधी नागेश पाटील कल्याण यांची नुकतीच व्हॉईस ऑफ मीडियाच्या पालक सचिव नांदेड दक्षिणपदी नियुक्ती नांदेड येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृहच्या सभागृह येथे आयोजित बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई काळे यांच्या सूचनेनुसार राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले सर. जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी सर. यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉईस मीडियाच्या या बैठकीत उपस्थित पत्रकार बांधवांच्यामते नांदेड जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर यांनी मांडलेल्या ठरावावर तुकारामजी सावंत यांच्या अनुमोदन प्रस्ताव मांडून निवड करण्यात आली.
या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय श्रीनिवास भोसले,जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी, ,उपाध्यक्ष तुकाराम सावंत,रवींद्र कुलकर्णी,सचिव अनिल धमणे, सूर्यकुमार यन्नावार, संघटक ऋषिकेश कोंडेकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सुरेश अंबटवार, बळवंत पाटील जाधव जांबकर,भारत वारणेरकर,डॉ सप्निल बनसोडे किशोरकुमार, वागदरिकर, गंगाधर ढवळे,पवनकुमार पुट्टेवड कुंटूरकर, आदी पत्रकार व व्हॉईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी इत्यादीच्या उपस्थितीत देवून त्यांचा विशेष सत्कार सन्मान करून संघटनात्मक बांधणी साठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या.
नायगावचे भुमी पुत्र नागेश पाटील कल्याण व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा पालक सचिवपदी विराजमान….!

0Share
Leave a reply