Disha Shakti

इतर

चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून राबविलेल्या विशेष मोहिमे दरम्यान दोन दिवसांत 77 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई कारवाई

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन यांनी काल 26 डिसेंबर व आज 27 डिसेंबर 2024 रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती या दोन दिवसांच्या मोहिमेदरम्यान काल 42 व आज 35 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. सदर वाहनांवर दोन दिवसांत 35,100/- रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसात कारवाईतील 77 वाहनांवर दोन्ही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे .राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोध ही सोपा होईल.

सदर चोरीचे वाहन शोध मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबरमे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फडोळ , पोलीस उपनिरीक्षक पाटील , पोलीस हवालदार फुल माळी, ठाणगे पो कॉ कदम, रवी कांबळे, दादा रोहकले, जालिंदर धायगुडे, सतीश कुराडे ,अंकुश भोसले, नदीम शेख यांच्या पथकाने केलेली आहे. नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आला आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!