Disha Shakti

क्राईम

बाभुळगाव व धामोरीच्या अवैध सावकारांवर गुन्हे दाखल

Spread the love

राहुरी तालुका प्रतिनिधी /  आर.आर.जाधव  : राहुरी तालुक्यातील बाभुळगाव व धामोरी येथील अवैध सावकारी करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय मच्छिंद्र कजबे (रा. बाभुळगाव) व जगदिश शिवाजी उगले (रा. धामोरी) असे अवैध सावकारकी करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत गिरीष काशिनाथ मुसळे (वय ४८, सहकार अधिकारी (द्वि.श्रे.) रा. सहाय्यक निबंधक यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, सावकारांचे

महानिबंधक तथा विशेष निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परिपत्रक दि. २१ जानेवारी २०१७ मध्ये नमूद केल्यानुसार जी व्यक्ती सावकारीचा परवाना प्राप्त न करता सावकारीचा धंदा करतो, असा व्यक्ती बेकायदेशीर सावकार असतो. त्याने केलेला व्यवहार म्हणजे बेकायदेशीर सावकारी व्यवहार असे नमूद करण्यात आले आहे. त्यावरुन दत्तात्रय मच्छिंद्र कजबे याच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमन २०१४ नुसार कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक समाधान फडोळ करत आहेत.

तसेच बाळासाहेब विठ्ठल रासकर (वय ५४, रा. माळीवाडा, कौठीची तालीम चौक, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हंटले आहे की, सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम १६ नुसार अवैध सावकारी व्यवसाय करत आहात याची पडताळणी करणे आवश्यक वाटल्याने प्राधिकृत अधिकारी यांनी जगदीश शिवाजी उगले (रा. धामोरी) यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून तक्रारदार यांच्याशी संबधित दस्तऐवज (छायांकित प्रत) जप्त करण्यात आलेले आहे. त्यानुसार तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेली माहिती खरी असल्याचे निदर्शनास आले आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडील जा.क्र. १६१३/२०२४ दि. १८ डिसेंबर व जा.क्र. १६१८/२०२४ दि. १९ डिसेंबर २०२४ च्या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे जगदिश शिवाजी उगले याच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमन २०१४ नुसार कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्हि.डी. पारधी करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!