Disha Shakti

क्रीडा / खेळ

ब्राईट फ्युचर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खडकी येथे भव्य आंतरशालेय वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : दिनांक 26 डिसेंबर 2024 व 27 डिसेंबर 2024 रोजी ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खडकी या विद्यालयात आंतरशालेय वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे खजिनदार माननीय तुषार काळे सर यांनी देवी सरस्वती व पद्मश्री पुरस्कार प्राप्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन , सर्व क्रीडा साहित्याचे पूजन तसेच नारळ फोडून ,मशाल पेटवून केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय सांगळे सर , संस्थेचे उपाध्यक्ष माननीय तेजस सर, सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमांमध्ये प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी रनिंग , फ्रॉग् जंप या खेळांचे तर पहिली ते अकरावी या विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो , उंचउडी ,लांब उडी, गोळा फेक, भालाफेक ,धावणे, कराटे याप्रमाणे अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
सर्व खेळ चुरशीचे झाले .कबड्डीचा खेळ तर खूप छान रंगला .सर्वत्र खूप उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळाचा मनमुराद आनंद घेतला . मेहनत, चिकाटी , एकाग्रता या गुणांच्या आधारे कोणत्याही क्षेत्रात महान व मोलाचे कार्य करून यशाचे उंच शिखर गाठता येते हे या दोन दिवसात विद्यार्थ्यांनी आत्मसात केले . हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय सांगळे सर ,खेळाचे शिक्षक माननीय पोळेकर सर व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतली . प्रचंड उत्साहात हा सोहळा संपन्न झाला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!