परसोडा प्रतिनिधी / नितीन पाटुळे : मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छ.संभाजीनगर यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात आज केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा परसोडा या ठिकाणी शनिवार रोजी शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली यामध्ये सर्वप्रथम भारताचे अर्थतज्ञ तसेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
यामध्ये जिल्हाधिकारी डॉ स्वामी साहेबांचा दशसूत्री कार्यक्रम, टार्गेट पीक अँप विद्यार्थी वापरासंबंधीमार्गदर्शन केले, पालक व विद्यार्थी व शिक्षक यांच्या मध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी चर्चा करण्यात आली, केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, तसेच अध्ययन स्तर चा केंद्रातील सर्व शाळांचा आढावा घेण्यात आला असे अनेक महत्वाच्या बाबींवर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत मागोवा घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक म्हणून दत्तात्रय थोरात वैभव म्हस्के विठ्ठल शेळके अनिता झुरावत नरेंद्र अहिरे यांनी अतिशय छान योग्य असे मार्गदर्शन केले आजच्या केंद्रस्तरीय परसोडा शिक्षण परिषदेसाठी गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर साहेब विस्तार अधिकारी बी के म्हस्के सर केंद्राचे केंद्रप्रमुख शामभाऊ राजपूत प्रशाला मुख्याध्यापक विकास तावरे मुख्याध्यापक परसराम धनवे अण्णासाहेब सुराशे व केंद्रातील सर्व शिक्षक तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अंशकालीन निदेशक हे सर्व उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गंगथडे मॅडम यांनी केले शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कवडे सतीश जाधव वरून शेळके काशिनाथ गावित श्रीधर कदम नामदेव चोरे किरण साबळे यांनी परिश्रम घेतले
Leave a reply