Disha Shakti

कृषी विषयी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ बियाणे विभागामार्फत आदिवासी भागातील शेतकर्यांना मोफत बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या बियाणे विभागाच्या आदिवासी उपयोजना (TSP) अंतर्गत प्राप्त अनुदानातून मौजे शिंगोशी, ता. कळवण, जि. नाशिक येथील आदिवासी शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांच्या विविध वाणांच्या बियाणे वाटपाचा कार्यक्रम शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत शिंगोशी या ठिकाणी पार पडला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांचे नेतृत्वाखाली व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रभारी कुलसचिव तथा बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन दानवले यांच्या उपस्थितीत एकूण 234 शेतकर्यांना कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन देणारे गहू वाणाचे अनुपम, अनुराग, नेत्रावती तसेच हरभरा पिकाचे विक्रम व विक्रांत या बियाण्यांचे वाटप लाभार्थी शेतकर्यांना करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी व पत्रकार बांधवांनी विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बिजोत्पादन अधिकारी डॉ. के.सी. गागरे, विपणन अधिकारी डॉ. डी.एस. ठाकरे व बियाणे प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी मौजे शिंगोशी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच महिला व पुरुष शेतकरी व परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!