Disha Shakti

इतर

राहुरी तालुक्यातील गाडकवाडी येथील विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

दिशाशक्ती राहुरी / आर.आर.जाधव : विवाहित तरुणाने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गाडकवाडी येथे शनिवारी (दि.२८) रात्री घडली. रमेश भाऊसाहेब गांगड (वय: २६ रा. गाडकवाडी, कुरणवस्ती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश गांगड हा कुटुंबीयांसोबत वीटभट्टीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. तो एकटा गाडकवाडी (कुरणवस्ती) येथे आला होता. घरी आल्यानंतर घरात कोणीही नसताना त्याने घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत रमेशचे वडील कामानिमित्त बाहेर गेलेले होते. आई शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेली होती. शेळ्या चारून रात्री आठ वाजता आई घरी परतली व शेळ्या बांधण्यासाठी दोरी शोधण्यासाठी घरात गेली तर रमेश घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी ताहाराबादचे उपसरपंच बापू जगताप यांना माहिती दिली. बापू जगताप, संजय गांगड, शंकर गांगड, सचिन गागरे, भैय्या गागरे हे घटनास्थळी दाखल झाले होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!