राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने पाच दिवसीय बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 06 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत होणार्या या प्रशिक्षण कार्यक्रमात ब्रेड, नानकटाई, नाचणी (नागली) बिस्किट, बन पाव, लादी पाव, टोस्ट, सुरती (जीरा) बटर आणि कप केक या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त या प्रशिक्षणामध्ये बेकरी व्यवसाय कसा सुरू करावा, अन्न व सुरक्षितता व मानके, कायद्याची माहिती आणि बेकरी उद्योगाची नोंदणी, बेकरी उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल, बेकरी पदार्थांचे पॅकेजिंग व मार्केटिंग, बेकरी उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, बेकरी उद्योगातील अडचणी, त्यावरील उपाययोजना, बेकरी उद्योगाचे व्यवस्थापन या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे बेकरी युनिट, मध्यवर्ती परिसरात सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत चालणार असून प्रवेश मर्यादा 25 आहे. या प्रशिक्षण वर्गाचे नोंदणी शुल्क रुपये 4500/- असे राहील.
या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणार्या प्रशिक्षणार्थींनी त्यांचे शुल्क लेखा व अधिदान अधिकारी, मफुकृवि, राहुरी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खाते क्रमांक 38817479754 IFSC code SBIN0003239 यावर शुल्क जमा करावे व त्याचा स्क्रीन शॉट कार्यालयाचे प्रतिनिधी श्रीमती सविता धनवडे मोबाईल नंबर 9421187540 यांच्या मोबाईलवर पाठवावे असे आवाहन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांनी केले आहे.
Leave a reply