Disha Shakti

क्रीडा / खेळ

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये विठ्ठलराव थोरात आयटीआय संघाने प्रथम क्रमांक पटकावला

Spread the love

इंदापूर  प्रतिनिधी/ प्रविण वाघमोडे : २६ डिसेंबर २०२४ ते २८ डिसेंबर २०२४ या काळामध्ये बारामती येथे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता यामध्ये अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात क्रिकेट संघांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये भिगवण येथील विठ्ठलराव थोरात आयटीआय भिगवण च्या क्रिकेट संघांनी अजिंक्य पद मिळवले. विठ्ठलराव थोरात आयटीआयचे शुभम वेदपाठक सर व भागवत पवार सर यांनी संघाला मोलाचे मार्गदर्शन केले.

विठ्ठलराव थोरात आयटीआय भिगवण संघाने मिळवलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमधील अजिंक्यपदासाठी संस्थेचे अध्यक्ष बापूराव थोरात संस्थेचे सचिव विजयभैया थोरात संस्थेचे खजिनदार संतोष थोरात तसेच प्राचार्य मोहिते के एस यांनी सहभागी संघातील विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!