बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. मात्र कचऱ्यात पडलेल्या प्लास्टिकचा पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहे. बिलोली तालुक्यातील अमृतधाम गोशाळा कासराळी येथे बजरंग दल व बिलोली पोलिसांनी तस्करीतून पकडलेल्या गाई गोशाळेमध्ये आहेत त्यातील एक गायीने काही दिवसापासून वैरणखाणे सोडले आहे. असेच पोट फुगत आहे त्या गाईची प्रकृती ढासळयाचे निदर्शनास आले. तेव्हा पशुसंवर्धन विभाग बिलोली अंतर्गत डॉ.उदगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्नेहा स्वामी,डॉ.अजय कचरे व टीम यांनी गोशाळेमध्ये येऊन गाईवर तीन तास यशस्वी शस्त्रक्रिया करून गाईच्या पोटातून तब्बल 30 किलो प्लास्टिकच्या पिशव्या,लोखंडाचे खिळे आदी काढण्यात आले. ऑपरेशन यशस्वी ठरले, गाईची प्रकृती स्थिर असून, रवंत करत आहे व वैरण खात आहे. तिचा पोटात बरेच दिवसापासून प्लास्टिकचा पिशव्या जमा होत्या.
राज्यात प्लास्टिक बंदी असली तरीही प्लास्टिकचा सर्रास वापर होतोय. हेच रस्त्यावर पडलेले प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या पिशवी मधील टाकलेले अन्न गाईला खायला देतात त्यामुळे गाईच्या पोटात प्लास्टिक जाते अशाप्रकारे प्लास्टिक टाकून गाईच्या जीवाशी खेळू नका असे आवाहन गोरक्षकांनी केले आहे.
Leave a reply