कांदिवली पश्चिम / भारत कवितके : रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चांदवड येथील रेणुका लान्स, मनमाड रोड चांदवड या ऐतिहासिक नगरीत मौर्य क्रांती महासंघ चे धनगर समाज जागृती परिषदेचे व तिसऱ्या अधिवेशनात चे आयोजन मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले.
सुरुवातीला सर्व समाज बांधव रेणुका माता मंदिर ला जाऊन दर्शन घेतले आणि तेथून रंग महाल येथे सर्व अहिल्याबाई होळकर यांची पूर्वी ची वास्तू जिर्ण झाल्याने जीर्णोद्धार चे काम चालू होते.अतिशय सुंदर नक्षीदार, सागवान लाकूड चार वापर करून पूर्वी सारखे बनविण्याचा प्रयत्न केला जात होता.पण याबाबत पण तुलना होऊ शकत नाहीत.लेझीम ढोल,वांझा या वाद्यांच्या तालावर धनगर समाज बांधव पुरुष व महिलांनी नृत्य केले.त्यावेळी होळकर रंग महाल ट्रस्ट होळकर वाडा चे ट्रस्ट सुभाष पवार यांचे हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि मशाली चे प्रज्वलन करून चांदवड गावात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ” येळकोट येळकोट जय मल्हार” च्या घोषणांनी चांदवड गाव दणाणून गेले.मशाल मिरवणुकीत छोट्या छोट्या दोन अहिल्याबाई होळकर यांची प्रतिकृती असलेल्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.होळकर वाड्यात सुभाष पवार यांनी या वास्तू रंग महाल नाव कसे पडले? हे सांगून तेथे जतन करून ठेवलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा फोटो या वाड्यात उपलब्ध आहे तो तुम्ही जरुर पहा, असे सांगितले, तर तेथे समाज बांधव संजय बिरारी यांनी जतन करून ठेवलेल्या ब्रिटिश कालीन नाण्यांचे प्रदर्शन भरविले होते. त्यांनीही रंग महाल होळकर वाडा यांची पुरातन माहिती सांगितली तर लक्ष्मण नजन यांनी अनेक उपयुक्त माहिती सांगितली. रेणुका माता मंदिर ते रंग महाल या ठिकाणी समाज बांधवांचे जास्तीत जास्त कार्यक्रम घेण्यात येऊन चांदवड या ऐतिहासिक नगरीचे महत्त्व वाढवावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असे मौर्य क्रांती महासंघ चे कार्यकर्ते समाधान बागल यांनी सांगितले. तर चांदवड येथील रेणुका लान्स मधील आकर्षक सभागृहात मान्यवर उद्घाटक शिवाजीराव शेंडगे, आर.एस. यादव, बलभीम माथेले, राजीव हाके, तुकाराम जानकर, उत्तमभाई कोळेकर, प्रमुख पाहुणे आनंदा होनमाने, विनोद इंगळे, संतोष सातपुते, भारत कवितके, सुभाष येळे,प्रकाश कुटे,सह अनेक मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि खंडोबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व्यासपीठावर तळी उचलून घोषणा देण्यात आल्या. व्यासपिठावरील सर्व मान्यवरांचे सत्कार मौर्य क्रांती महासंघ कडून करण्यात आले. प्रा.आर.एस.यादव लेखक व विचारवंत यांना सत्यशोधक प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रा.आर.एस.यादव यांनी सांगितले की,” माणुस गेल्यावर त्यांचे महत्त्व कळते तसेच इतिहासाचे आहे.माझे कुटुंब आणि मी सत्यशोधक मार्गाने चाललो आहे.सत्याचा शोध घेणे हा गुन्हाच असेल तर तो मी रोज करणार.सत्याचे समर्थन नेहमी करणार.इतिहासाचु पेरणी करावी जरुर उगवेल.” चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.चित्रकलेचे प्रदर्शन भरविले होते.दुपारी जेवणानंतर दुसऱ्या सत्रात अनेक मान्यवरांनी आपले विविध विषयांवर मार्गदर्शन केले.या अधिवेशनात शाहीर डॉ.रविंद्र नामदेव बंडगर, शाहीर भिमराव निवृत्ती जानकर व सहकारी यांनी ओवी तून प्रबोधन केले.
चांदवड येथे मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने तिसरे अधिवेशन व धनगर समाज जागृती परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply