श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : अशोकनगर येथील सेठी किराणा हे होलसेल व रिटेल दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तेजिंदरसिंग सेठी (वय 48, रा. वॉर्ड नं. 1, दशमेशनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, अशोकनगर येथे सेठी किराणा नावाचे दुकान असून दि. 27 डिसेंबर रोजी आपण नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजता दुकान बंद करून कुलूप लावून घरी आलो.
दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता पुन्हा अशोकनगर येथे जावून दुकान उघडले असता दुकानाच्या आतमध्ये गेल्यावर आतील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. तेव्हा दुकानाच्या छताचा पत्रा उचकटलेला दिसला. त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून किराणा माल चोरून नेल्याचे लक्षात आले. दुकानातून चोराने 33 हजार 400 रूपयांच्या गायछाप तंबाखूच्या पुड्या, 1 लाख 4 हजार 535 रूपयांची बीडीचे बंडल, 12 हजार 600 रूपयांचे ब्रिस्टॉल सिगारेट आणि 8 हजार 300 रूपयांचे गोल्ड फ्लॅक सिगारेट असा एकूण 1 लाख 8 हजार 835 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोकनगर येथील सेठी किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले ; सुमारे दिड लाखाचा मुद्देमाल चोरीस

0Share
Leave a reply