Disha Shakti

सामाजिक

संघर्षावर मात करून सर्वांच्या सुखदुःखात, हिरारीने भाग घेणारा…मधुकर अण्णा बंदपट्टे

Spread the love

तुळजापूर विशेष प्रतिनिधी : चंद्रकांत हगलगुंडे, अणदूर

वाढदिवस विशेष : जीवन एक वनवा आहे…
कुणीतरी पेटवलेला…
कसातरी पेटलेला…
आणि कधीतरी अकस्मात विझणारा ..

प्रत्येकाचे अपवाद वगळता जीवन येनकेन प्रकारे संघर्ष मयच, यश अपयश , चढउतार यावर मात करून चार हात करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची धमक मात्र अपवादात्मकच पहावयास मिळते. अगदी तसेच संघर्षावर मात करून सर्वांच्या सुखदुःखात हिरारीने भाग घेऊन अणदूर पंचक्रोशीत बांधकाम व्यवसाय बरोबरच प्रत्येक घटकाशी नाळ जोडणारा म्हणून ओळख असलेला मधुकर अण्णा बंदपट्टे यांचे सर्व जाती धर्मात, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचाच अण्णा अशी खासियत असलेला अण्णांचा आज 1 जानेवारी रोजी जन्मदिन, त्यांच्या या यशस्वी वाटचालीत दिशाशक्ती न्यूज परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन व शुभेच्छा…

मधु अण्णाचे शिक्षण तसे जेमतेमच, मात्र समाजाचे शिक्षण अफाट… घरची परिस्थिती अत्यंत हलाखीचे वडील गवंडी काम विशेषतः दगडी नक्षी काम करण्यात हातखंडाच. लहानपणापासूनच दगड मातीची आवड संपूर्ण तालुक्याबरोबरच आसपासच्या तालुक्यातही बांधकाम क्षेत्रात त्यांचे खास ओळख, निव्वळ कर्मभूमीत पाचसेहून अधिक कुटुंबाचा उदरनिर्वाह व संघटन निश्चितच भूषणावह व प्रेरणादायी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात अण्णांची खास ओळख . लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती अगदी ग्रामपंचायत अशा निवडणुकीत जिकडे आण्णा तिकडे विजय पताका एवढे असूनही ना गर्व.. ना घमेंड अडचणीतील सर्वांच्याच सोबतीला धावून जाणारा प्रसंगी पदरमोड करून अनेक कुटुंबाचा आधारवड अशी विशेष ओळख… ना जात.. ना पात.. ना पक्ष समाजाच्या हितासाठी जो हात देईल त्याला साथ देण्याची अण्णांचे खासियत. अण्णा नेहमी समाज मनात, समाजहित विशेष म्हणजे राष्ट्रहीत जोपासणारा वडार समाजाबरोबरच दुर्लक्षित वंचित समाजासाठी तन मन धनाने काम करणारा युवकांच्या गळ्यातील ताईत अशीच त्यांची ओळख.

अण्णांच्या सहवासात सुनील चव्हाण, दीपक आलूरे, डॉ. जितेंद्र कानडे, श्रीकांत अंदुरकर, रामचंद्र आलूरे सह विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणारे असंख्य ज्येष्ठ, श्रेष्ठ जणांचा सहवास निश्चितच प्रेरणादायी म्हणावे लागेल. साधी राहणी उच्च विचारसरणी, तळागाळापासून हाय प्रोफाईल पर्यंत त्यांचा सहवास समाजाला प्रोत्साहित करणारा आहे. अण्णांच्या या जन्मदिनी जय मल्हार पत्रकार संघ, खडकाळी ग्रुप, 8 फार्मा ग्रुप, बजरंग दल यांच्यावतीने कोटी कोटी शुभेच्छा…


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!