Disha Shakti

सामाजिक

शौर्य दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे रमाई आंबेडकर चौक फलकाचे अनावरण

Spread the love

तुळजापूर तालुका प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे १ जानेवारी भिमा कोरेगाव २०७ वा शौर्य दिनानिमित्त अणदूरचे युवा कार्यकर्ते यांनी अणदूर ग्रामपंचायत सदस्य डॉ विवेक बिराजदार यांच्या हस्ते माता रमाई आंबेडकर चौक बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या जल्लोषात भिमा कोरे गाव शोर्य दिन साजरा करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजा स्वामी तसेच विकास सहकारी सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन राजेश देवसिंगकर, सौंदर्या फॅशन वेअरचे मालक गौतम बनसोडे, कंटु संभा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अमर चंदनशिवे, बापू कांबळे गुरुजी, गोरख तुकाराम कांबळे, दिपक मधुकर कांबळे, राम कांबळे, महेश बागडे, मारुती बागडे, शुभम सुर्यवंशी, शुभम मधुकर नितीन बनसोडे कांबळे, ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाप्रमुख महादेव जेटीथोर, युवा कार्यकर्ते रोहीत गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तुळजापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पत्रकार राहुल कांबळे, संतोष कांबळे, निखिल कांबळे, अनिकेत कांबळे, राजु कांबळे, किशोर कांबळे, तानाजी सुर्वे, विजय कांबळे, पत्रकार राज मुकरे, सचिन सोनवणे, पारजीत सोनवणे, शाहूराज कांबळे, राजेंद्र कांबळे, लक्ष्मण सुरवसे, गणेश सुर्यवंशी मेंबर पंडित ढवळे मेजर, मल्लिनाथ जाधव, अक्षय दुपारगुडे, संजय गवळी, किशोर कांबळे युवा कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी चौकात बोर्ड उद्घाटन करुन भिमा कोरेगाव शौर्य दिवस साजरा केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजात दादा आंबेडकर युवा मंच अणदूर, सिध्दार्थ तरुण मंडळ, बुद्ध दर्शन तरुण मंडळ,दयावान ग्रुप, आदर्श ग्रुप यांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!