इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : आज जाहीर झालेल्या महाराष्ट्र शासन आरोग्यसेवक यादीत विनोदचे नाव झळकले आणि सर्वांचा आनंदाला उधाण आले.विनोद हा मूळचा वरकुटे खुर्द या इंदापूर तालुक्यातील गावचा. घरची परिस्थिती बेताचीच वडील शेतकरी तर आई शालेय पोषण आहार मदतनीस. घरीत दोन भावंडे. थोरली रेश्मा आणि धाकटा विनोद .मुलांनी खूप शिकावे आणि मोठे व्हावे हा मानस आई बाबांचा. झाले तसेच गेल्या वर्षी रेश्मा psi झाली ती नुकतीच नाशिक येथे ट्रेनिंग ला गेली आहे आणि आज नववर्षाची सुरुवात विनोदने यश मिळवून केली. खरे तर आई बाबांच्या स्वप्नांचे चीज करणारी ही भावंडे .जिद्द चिकाटी आणि संयमाची कसोटी अखेर या पहिल्या यशाने फलित झाली.
विनोद हा राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास गेली 5 वर्षांपासून करत आहे.त्याने combine परीक्षेच्या मेन्स परीक्षाही या पूर्वी दिल्या आहेत.पण अपयशाने खचनारा आणि यशाने हुरळून जाणारा विनोद नाही .आज विनोदला मिळालेले हे यश त्याच्या भविष्यात मिळणाऱ्या मोठ्या यशाची नांदी असेल.आता तर त्याच्या यशाचा अंकुर फुटलाय निश्चित त्याचा विशाल वृक्ष करण्याचे सामर्थ्य विनोद मध्ये आहे यात शंका नाही. विनोद हा ट्रिक्स अभ्यासिकेत अभ्यास करतो. सर्वांना सुपरिचित आणि त्याच्या स्वभावगुणांनी सर्वांचा आपलासा आहे.त्याच्या यशाने आज ट्रिक्स अभ्यासिकेत आणखी एक अधिकारी घडला . विनोदने मिळवलेले हे यश नक्कीच ट्रिक्स मध्ये येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असेल.
इंदापूर तालुक्यातील विनोद दडस यांची महाराष्ट्रशासन आरोग्यसेवक (सातारा) या पदी निवड ; दडस हा ट्रिक्स अभ्याशिकेचा विद्यार्थी

0Share
Leave a reply