मुंबई कांदिवली पश्चिम. / भारत कवितके : सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी पुणे येथील वाफगाव येथील महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा करीता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.सालाबादप्रमाणे यावर्षी ही पुणे वाफगाव यैथे होणाऱ्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा.शूर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर यांचे आपण वारसदार आहोत.वयाच्या अवघ्या २४ वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८०५ मध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतः राज्याभिषेक करून ते होळकर घराण्याचे महाराजा झाले.
छत्रपती शिवाजी महाराज नंतर राज्याभिषेक करून महाराजा बनलेला यशवंतराव होळकर हा एकमेव राजा होय.इंग्रजांना लढाईत १८ वेळा पराभूत करून सळो की पळो करून सोडले होते.तमाम धनगर समाज बांधवांनी आपसातील मतभेद विसरून,पक्ष संघटना संस्था, प्रतिनिधी या एकत्र येऊन पुणे वाफगाव यैथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे.असे आवाहन धनगर समाजाचे जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके केले आहे.
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्रकार भारत कवितके यांचे आवाहन.

0Share
Leave a reply