राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी फॅक्टरी परिसरातील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका पेट्रोल पंपा जवळ एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतल्याने एकच धांदल उडाली. ही घटना शुक्रवार दि. 3 जानेवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी फॅक्टरी येथील एका पेट्रोल पंपावरून शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी डिझेल टाकून बाहेर पडली असता तीने अचानक पेट घेतला.
गाडीला आग लागल्याने एक धांदल उडून पळापळ सुरू झाली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करून देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आग्निशामक बंबाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली. गाडीतील बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे या गाडीने पेट घेतल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. सुदैवाने या चारचाकी गाडीने पेट्रोल पंपाच्या बाहेर पडल्याने पेट घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
राहुरी फॅक्टरी परिसरात पेट्रोल पंपावर डिझेल भरून बाहेर पडताच कारने घेतला पेट ; अनेकांची उडाली धांदळ

0Share
Leave a reply