Disha Shakti

शिक्षण विषयी

विठ्ठलराव थोरात इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यनियर कॉलेज तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवणचा वार्षिक पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

Spread the love

इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : शनिवार दि. ०४/०१/२०२५ रोजी विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भिगवण थोरात नगर येथे या स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे कार्यक्रमाला लाभले होते. त्यांचे स्वागत विद्यार्थिनी कडून झांज पथक व लेझीम पथक खेळत करण्यात आले. तसेच मा. श्री. प्रदीप दादा गारटकर, मा. श्री. विनोद महांगडे, मा. श्री. अजिंक्य खरात, मा. श्री. संजय खालतकर, भिगवण ग्रामपंचायत सरपंच मा. सौ दीपिका क्षीरसागर, मा. सौ. मनिषा दुर्गे, मा. श्री. सत्यवान भोसले, मा. श्री. ॲड. महेश दादा देवकाते, मा. श्री. बापूराव थोरात, मा. श्री. विजय भैय्या थोरात, संस्थेच्या प्राचार्य सौ. वंदना थोरात मॅडम, मा. श्री. मारुतराव थोरात, मा. श्री. नंदकिशोर थोरात, मा. श्री. संतोष थोरात, मा. श्री. अजय थोरात यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. नंतर विद्यालयाच्या सर्व महिला शिक्षकांनी आपल्या मधुर स्वरामध्ये स्वागत गीत गाऊन आदरणीय मामांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. नंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हातसे दीपप्रज्वलन करण्यात आले. आदरणीय मामांचा सत्कार थोरात कुटुंबीयान कडून करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.नंतर विद्यालयाच्या प्राचार्य सौ वंदना थोरात यांनी प्रास्ताविक केले तसेच श्री. महेशदादा देवकाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नंतर आदरणीय मामांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी आदरणीय मामाच्या समवेत गणपती सॉंग इयत्ता सातवी ब, शिवतांडव इयत्ता सहावी, हिरकणी सॉंग इयत्ता बारावी, मला भुताने झपाटलं इयत्ता सहावी, आर्मी थीम इयत्ता आठवी असे विविध गीत डान्स त्यांच्यासमोर सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भोसले सर व सौ. नायब मॅडम यांनी केले. तसेच पुढील सूत्रसंचालन इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. नंतर नर्सरी युकेजी एलकेजी इयत्ता पहिली ते बारावी सर्वांनी आपले कलागुण करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच विद्यालयाचे पिटी शिक्षक श्री घुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्शल आर्ट व मर्दानी खेळ सादर करण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. नगरे मॅडम यांनी केले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!