राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख : सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व इंग्लिश मीडियम विद्यालयाचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. महानंद माने सचिव सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ उपस्थित होते .तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा काव्य करणारे सुप्रसिद्ध कवी मा.श्री.अनंत राऊत तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा.श्री. सुनील पांढरे तसेच मा.श्री. संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, मा.श्री.सचिन ओहोळ अमेरिकेतील बिझनेसमेन माजी विद्यार्थी उपस्थित होते त्याच प्रमाणे सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री अरुण तुपविहिरे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब खेत्री इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता आठरे माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब डोंगरे पर्यवेक्षक श्री.मनोज बावा उपस्थित होते तसेच विद्यालयाचे अध्यापक प्रतिनिधी म्हणून श्रीमती मनीषा कदम मा श्री ज्ञानेश्वर ढोकणे श्रीमती वाबळे शिक्षकेतर प्रतिनिधी श्री भानुदास आढाव श्री गोरक्षनाथ वर्पे श्री हिरामण साळवे उपस्थित होते त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी चिरंजीव प्रथमेश गोकुळ ठाकूर कुमारी.श्रावणी संजय शेळके चिरंजीव संग्राम अनिल जावळे कुमारी नीती गणेश झावरे चिरंजीव चिरंजीव मित राकेश राका कुमारी संस्कृती राहुल वाघमारे चिरंजीव प्रसाद रमेश पंडित कुमारी साक्षी विजय कोतकर चिरंजीव मुनीर शेख कुमारी तेजस्वी नानासाहेब खेडकर इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली उपस्थितांचे मान्यवरांचे सत्कार करण्यात आली प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पाहुण्यांचा परिचय करून दिला माजी विद्यार्थी श्री सुनील पांढरे मा श्री संजय ठेंगे यांनी भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना उदबोधित केले .
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या ख्यातनाम असणारे सुप्रसिद्ध कवी मा.अनंत राऊत यांनी काव्यमय ओघवत्या वाणीने प्रेक्षक वर्गाला खेळीमेळीच्या वातावरणात मंत्रमुग्ध केले त्यांनी देव मंदिरात न शोधता आपल्या आई-वडिलांमध्ये देव असतो हा संदेश देणारी त्यांच्या मायबाप या कवितेतून आई-वडिलांचे ऋण विसरू नका . त्यांची सेवा करा हेच आपले दैवत आहे असा विद्यार्थी व प्रेक्षक वर्गाला मनाला भिडणारा मोलाचा संदेश दिला . प्रेक्षक वर्गाच्या मागणीवरून त्यांनी अतिशय रसाळ वाणीने भोंगा कविता सादर केली.
जीवनातील विविध अनुभव सांगून त्यांनी प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध केलं शाळेचे माजी मुख्याध्यापक मा.श्री शिवथरे सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आलेल्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष मा.श्री.महानंद माने यांनी देखील आपल्या रसाळ कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपकृत केले यानंतर वर्षभरातील शालेय उपक्रम विविध स्तरावरील विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळातर्फे दिले जाणारे गोपनीय पुरस्कार सावित्री कन्या सावित्री पुत्र विद्यार्थी प्रिय शिक्षक शिक्षिका गरीब होतकर विद्यार्थी उत्कृष्ट खेळाडू निसर्गप्रेमी विद्यार्थी एनसीसी आणि त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी गुणवंत विद्यार्थी आदी पुरस्कार देण्यात आले.
यावेळी पत्रकाराचांही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा टेमकर व श्रीमती शेटे मॅडम यांनी करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली कार्यक्रमाचे आभार विद्यालयच्या उपमुख्याध्यापक श्री बाळासाहेब डोंगरे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते मोठ्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला .
Homeशिक्षण विषयीसावित्रीबाई फुले माध्यमिक, प्राथमिक व इंग्लिश मिडीयम विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
सावित्रीबाई फुले माध्यमिक, प्राथमिक व इंग्लिश मिडीयम विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

0Share
Leave a reply