राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे काही दिवसांपूर्वी एका तरुणाने आपल्या पत्नीस प्रियकरासोबत पाहील्याने आत्महत्या केल्याची घटना घटना उघडकीस आली होती या घटनेबद्दल पतीस आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी महिला व तिच्या प्रियंकारास राहुरी पोलिसांकडून अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
दिनांक 04/01/2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु र नं-06/2025 बीएनएस कलम- 108, 115(2) 351 (2)(3)3(5) प्रमाणे आत्महतेस प्रवृत्त केल्याचा , गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1)ताराबाई रमेश गांगुर्डे वय. 25, 2)रवींद्र एकनाथ गांगड वय 29 3)सचिन एकनाथ गांगड वय. 19 सर्व राहणार कुरन वस्ती ताहाराबाद ता.राहुरी यांनी मयतास आत्महतेस प्रवृत्त केल्याचे गुन्ह्यात अटक केली आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली ,psi समाधान फडोळ,पोलीस हेड कॉन्स्टेबल , पोना, रामनाथ सानप , पोहेकॉ जानकीराम खेमणार, पोकॉ, अविनाश दुधाडे. पोकॉ रवींद्र कांबळे आजिनाथ पाखरे, नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर यांनी केलेली आहे.
ताहाराबाद येथील पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी महिला व तिच्या प्रियंकारास राहुरी पोलिसांकडून अटक ; चार दिवसांची पोलीस कस्टडी

0Share
Leave a reply