राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 03/01/ 2025 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी तसेच या गुन्ह्यातील पिडिता हिला आरोपी नामे आकाश गोरक्षनाथ पवार राहणार पिंपरी अवघड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांनी लग्नाचे आमिष दाखवून पळून नेलेले आहे अशा फिर्यादीवरून हुपरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे गुन्हा रजिस्टर नं. 015/2025 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील पीडिता तसेच आरोपी यांचा शोध घेण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी याला आज दिनांक 08/01/2025 रोजी पकडून हुपरी पोलीस स्टेशन चे पोसई हजारे साहेब यांच्या ताब्यात दिले असून सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सो यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ व पोलीस नाईक गणेश सानप व पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट यांनी केली आहे
Leave a reply