पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिराचे आज धोत्रे बुद्रुक, तालुका पारनेर येथे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शाहीदजी काझी सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वनिताताई चंद्रकांत कसबे (सरपंच धोत्रे), माननीय सौ. रोशनीताई राजू रोडे (उपसरपंच धोत्रे),कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री तुकाराम कातकडे साहेब(निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण आहील्यानगर) हे ही उपस्थित होते. श्री संदीप कुसळकर (संस्थापक युवान अहील्यानगर) यांनीही विद्यार्थ्यांना श्रमसंस्कारबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य धोत्रे बुद्रुक, श्री. अशोक देवराम जाधव (मुख्याध्यापक श्रीमान शेठ होनाजी कोंडाजी ढोमे माध्यमिक विद्यालय, धोत्रे) संदीप महांडुळे सर (मुख्याध्यापक. प्राथ. आश्रम शाळा, ढवळपुरी) , कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जमील शेख सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतुल मोरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख जमील सर यांनी केले.याप्रसंगी कार्यक्रम सह अधिकारी प्रा. जयश्री भोंडवे मॅडम, प्रा. कावेरी गवते मॅडम, प्रा. किरण कारंडे सर, प्रा. योगेश भुसारी सर, प्रा. सागर वाव्हळ , प्रा. राहुल शेलार, प्रा. रोहित जाधव, शिक्षकेतर कर्मचारी श्री. फारुख राजे, श्री. अभिजीत किंनकर, श्री. वैभव गावडे, श्री. मोहित गोरड, विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थीनी प्रतिनिधी, सर्व विद्यार्थी, समस्त ग्रामस्थ धोत्रे बुद्रुक यावेळी उपस्थित होते.
Homeशिक्षण विषयीधोत्रे बुद्रुक येथे ढवळपुरी येथील धन्वंतरी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न..
धोत्रे बुद्रुक येथे ढवळपुरी येथील धन्वंतरी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न..

0Share
Leave a reply