Disha Shakti

शिक्षण विषयी

गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरला आनंदी बाजार ; विद्यार्थीच बनले विक्रेते तर पालक व शिक्षक बनले ग्राहक

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्वस्त आणि मस्त आनंदी बाजार या उपक्रमाचे आयोजन  गुरुवारी 9 जानेवारी रोजी शाळेत करण्यात आले होते. या आनंदी बाजाराचे उद्घाटन शाळा मुख्यध्यापिका जपकर मॅडम यांच्याहस्ते हस्ते करण्यात आले. या आनंदी बाजाराद्वारे विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, नफा – तोटा यासारख्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्वकमाई व स्वयंरोजगार याचे संस्कार व्हावेत, श्रमाचे महत्त्व शालेय वयातच या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील बहुसंख्य विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध खाद्य पदार्थ या आनंदी बाजारात लक्षवेधी ठरल्या. या सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थ व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आपल्या वस्तू विकल्या गेल्याचा आनंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. अशी माहिती श्रीमती मोरे मॅडम यांनी दिली.

या उपक्रमाला गोटुंबे आखाडा येथील नागरिकांनी सहभाग घेऊन बालकांचा आनंद द्विगुणित केला या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी शाळेतील मुख्यध्यापिका जपकर मॅडम, कल्हापुरे मॅडम, निमसे मॅडम, कमळापूर मॅडम, मोरे मॅडम, साळवे मॅडम, कांबळे मॅडम व दुधाडे मॅडम या महिला शिक्षकांनी अथक परीश्रम घेतले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!