राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 9 1 2025 रोजी विद्यार्थ्यांतील आपसात झालेल्या किरकोळ कारणावरून श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा वरवंडी येथील इयत्ता दहावीचे दोन विद्यार्थी व नववी चा एक विध्यार्थी नामे 1. शैलेश गणपत गायकवाड वय सोळा वर्ष राहणार एमआयडीसी अहिल्यानगर , 2. किशोर सुनील गायकवाड वय पंधरा वर्षे राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर, 3. आर्य स्वामी समाधान सानप वय 14 वर्ष राहणार जालना हे तिघेही ह. मु. गाडगे महाराज आश्रम शाळा वरवंडी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर हे शाळेतून निघून गेलेले होते.त्यांचा शाळा प्रशासनाने शोध घेऊन ते मिळून न आल्यामुळे दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे त्यांना अज्ञात इसमाने पळून नेल्याबाबत फिर्याद दाखल केलेली होती.
सदर घटनेचा तपास करताना राहुरी पोलिसांना सदर विद्यार्थी हे शिर्डीत असल्याची माहिती मिळाल्याने आज रोजी राहुरी पोलीस स्टेशनचे पथकाने सदर विद्यार्थ्यांचा शिर्डी येथे जाऊन शोध घेतला व त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांचे कुणीही अपहरण केलेले नव्हते ते स्वतःहून शाळेतून निघून गेले होते असे सांगितल्याने त्यांना शाळा प्रशासनाच्या ताब्यात दिले. तसेच सदर बाबत त्यांच्या पालकांनाही कळवण्यात आले.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कडू बर्वे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ लेखनिक रवींद्र कांबळे शोध पथकाचे पोलीस शिपाई प्रमुख ढाकणे आजिनाथ खेडकर पोलीस हवलदार सुरज गायकवाड यांच्या पथकाने केली.
वरवंडी येथील संत श्री गाडगेबाबा आश्रम शाळेतून निघून गेलेल्या विद्यार्थ्यांचा राहुरी पोलिसांनी लावला शोध ; शिर्डीतून तिघांना ताब्यात घेऊन केले शाळा प्रशासनाच्या स्वाधीन

0Share
Leave a reply