राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : डॉ. अनिल गंगाधर दुरगुडे यांना सूक्ष्म अन्नद्रव्येवर केलेल्या शेतकरीभिमुख संशोधनामुळे राज्यस्तरीय परिसंवादेत कै. उषा सेंडे पारितोषीक देवून सन्मानीत करण्यात आले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील मृदविज्ञान विभागांतर्गत भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा, राहुरी आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेती आणि उपजीविकेची सुरक्षासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर राज्यस्तरीय दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय परिषदेमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल गंगाधर दुरगुडे यांना कै. उषा सेंडे पारितोषीक देवून सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार सूक्ष्म अन्नद्रव्येमध्ये उत्कृष्ठ संशोधन लेख प्रसिद्ध होणे व सूक्ष्म अन्नद्रव्यांवर चांगले काम करणार्या संशोधकांस दिले जाते. डॉ. अनिल दुरगुडे यांनी 16 वर्ष सूक्ष्मअन्नद्रव्ये योजनेत काम करून शेतकर्यांसाठी 12 शिफारशी दिल्या आहेत. त्यांनी व्यापारी तत्वावर फुले द्रवरुप सूक्ष्मग्रेड ग्रेड II हे पोषक तयार केले असून त्याच्या विक्रीतून विद्यापीठाला दोन वर्षात 3.25 कोटीचा महसूल मिळाला आहे. शेतकरी बांधव {वविध पिकांसाठी सूक्ष्मग्रेड II याचा वापर करत असतात. डॉ. दुरगुडे यांचा एकूण 37 वर्ष संशोधनांचा अनुभव असून अॅग्रोवन दैनिकामध्ये एकुण 112 मराठी लेखाद्वारे जमीन आरोग्य, कर्ब व्यवस्थापन आणि सूक्ष्मअन्नद्रव्याचे महत्त्व या विषयावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये त्यांना मृदगंध हा पुरस्कार जमिनीच्या आरोग्याबद्दल उत्कृष्ट काम केल्यामुळे परभणी चाप्टर, भारतीय मृद विज्ञान संस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिला आहे.
Leave a reply