पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 3 रीत शिकणारी कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा राहत्या घरी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. कु. ईश्वरी सदैव हसतमुख असणारी गुणी व हुशार मुलगी होती. तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत असून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ज्यांची मुले, मुली गावाबाहेरील वस्तीवरून प्राथमिक, माध्यमिक शाळेत येतात त्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील रोकडे वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू

0Share
Leave a reply