दिशाशक्ती विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शेवगाव तालुक्याचे सुपुत्र, रासपचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांचे विश्वासू सहकारी, डॉ. प्रल्हाद पाटील यांची यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर यांनी फलटण येथे त्यांना यावेळी निवडीचे पत्र दिले.
राष्ट्रीय समाज संघटन वाढविण्यामध्ये व अहोरात्र कष्ट करणारे डॉ. प्रल्हाद पाटील यांना त्यांच्या पक्षवाढी मध्ये सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यांना त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी त्यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आह़े. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, केंद्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, केंद्रीय मुख्य महासचिव कुमार सुशिल पाल आदी उपस्थित होते.
डॉ. प्रल्हाद पाटील हे श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावचे सुपुत्र असल्याने त्यांच्या निवडीबद्दल नाऊर येथील विठ्ठल गहिरे, कृष्णा गुंड, गणेश राशिनकर, संजय गुंड, तन्वीर शेख, सुदाम गायकवाड, कैलास हुरे, बाळासाहेब घंगाळे या ग्रामस्थांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Leave a reply