राहुरी प्रतिनिधी / ज्ञानदेव सुरशे : दिनांक 16/01/2025 रोजी राहुरी येथील आठवडे बाजारत दोन संशयित मुले फिरत आहेत अशी गोपनीय बातमी मिळाल्याने माननीय पोलीस निरीक्षक सो ठेंगे साहेब यांनी राहुरी पोलीस स्टेशन कडील तपास पथक यांना तात्काळ माहिती देऊन सदर बाबत खात्री करण्याकरता पाठवले असता त्या दोन मुलांना रंग हात पकडून त्यांचे नाव विचारले असता त्यांनी 1) मंगेश तुकाराम जाधव वय 19 वर्ष 2) किरण अशोक नकवाल वय 25 वर्ष दोन्ही राहणार गांधी नगर, शिक्षक कॉलनी, पेठ पोलीस स्टेशन बीड जिल्हा बीड असे सागितले व त्यांना राहुरी पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो व पोलीस स्टेशन येथे दिनांक 16/01/2025 रोजी गु र नं 29/2025 BNS 109(5),111 वगैरे मध्ये अटक करून त्यांना दिनांक 17/01/2025 रोजी माननीय राहुरी न्यायालया सो यांनी पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हे करत आहेत
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, पोहेकों सुरज गायकवाड, पोकॉ/प्रमोद ढाकणे, पोकॉ/ सतीश कुऱ्हाडे, पोकॉ/नदीम शेख, पोकॉ सचिन ताजणे पो कॉ अंकुश भोसले संतोषकुमार राठोड तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे.
राहुरी येथील गुरुवार आठवडे बाजारातून मोबाईल चोरी करणारे दोन इसमांना राहुरी पोलीस पथकाने घेतले ताब्यात

0Share
Leave a reply