जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुले व इतर बालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे टाकळी ढोकेश्वर येथील आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित निराधार,बालकाश्रम बालगृह मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा शुभारंभ गुरूवारी (दि. १६ ) करण्यात झाला. बाल महोत्सवाचे उद्घाटन बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा ऍड. नंदनवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ होते.
प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर पगारे विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास नाशिक विभाग, मनोज ससे जिल्हा कार्यक्रम अधिकारी बालकल्याण जिल्हा अहमदनगर, महादेव जायभाये बालविकास प्रकल्प अधिकारी, निलेश राऊत बालविकास प्रकल्प अधिकारी, वैभव देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संजय सांगळे जिल्हा परिविक्षा अधिकारी, महेंद्र दराडे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ऍड. नंदनवार सदस्या बाल न्याय मंडळ अहमदनगर, ऍड. अनुराधा येवले सदस्या बालकल्याण समिती,वर्षा खोळदकर सदस्या बालकल्याण समिती, तुषार कवडे बालकल्याण समिती यांची उपस्थिती होती.
चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या निमित्ताने मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. बालकांनी बाल महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडा व कला गुण प्रदर्शित करीत भविष्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करावा, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.कार्यक्रमाला जिल्ह्यातील ३५ निराधार , बालसंगोपन, निराश्रित, बालिकाश्रम,बालगृह, स्नेहालय बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन समुपदेशक वैभव देशमुख यांनी केले. आभार परिविक्षा अधिकारी रावसाहेब झावरे सर झावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी एन. बी. कराळे, विनायक आव्हाड, राजेंद्र हासे, सचिन तरवडे, डॉ. अरुण इथापे, सीएसऎ संस्थेच्या जूई झावरे व चाईल्ड लाईन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply