Disha Shakti

इतर

दिव्यांग बांधवांनी केले चार हजार फुट केंजळगडाचे अंतर पार

Spread the love

दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दि.१९. शिर्वुजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गाडे सर यांनी केंजळगड मोहीम 18 व 19 / 01 /2025 रोजीली होती सकाळी सात वाजता किंजळगडाच्या 4261 फुट उंचीच्या पायथ्यापासून सुरुवात केली 10 वाजता गडावरती पोहोचलो बारा वाजेपर्यंत पूर्ण गड फिरून झाला वरती नंतर साडेबारा वाजता खाली उतरण्यास सुरुवात केली.

साडेतीन वाजता खाली जेवण करून विश्रांती घेतली नंतर निघून वाई येथे येऊन नाना फडणवीस यांचा वाडा पाहुन त्या मध्ये खुप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नंतर वाई गणपतीचे दर्शन घेतले. नंतर मांढरदेवी काळूबाईचे दर्शन घेऊन पुण्याकडे रवाना झालो. त्या मोहिमेत दहा दिव्यांग बंधू होते. शिवाजी गाडे, कचरू चांभारे, श्री जगन्नाथ चौरे, जालिंदर दिवेकर, जीवन टोपे, सतिश आळकुटे, निर्मल, कल्याण घोलप, श्री बाप्पु कुडले व इतर दिव्यांग बांधाव होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!