जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : अनाथ, निराधार, निराश्रित,उन्मार्गी व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेंस आदर, बंधुभाव,सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल मोहोत्सव अत्यंत उपयुक्त आहे,असे प्रतिपादन नाशिक विभागाचे उप आयुक्त, महिला व बाल विकास चंद्रशेखर पगारे यांनी केले.
महिला व बालविकास विभागाच्यावतीने टाकळी ढोकेश्वर येथील आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित निराधार बालकाश्रम सभागृहात चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन १६ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. या महोत्सवाचे बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम मान्यवरांच्या पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय उप आयुक्त चंद्रशेखर पगारे, बालकल्याण समिती सदस्या ऍड. अनुराधा येवले, बालकल्याण समिती सदस्य तुषार कवडे, जिल्हा व बाल विकास अधिकारी नारायण कराळे,परिविक्षा अधिकारी संजय सांगळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी महेंद्र दराडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख उपस्थित होते.
तीन दिवसीय बालमहोत्सवात जिल्ह्यातील सर्व बालगृहातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बाल महोत्सवावेळी बालकांच्या चेहर्यावर मोठा आनंद पहावयास मिळाला. १६ जानेवारी रोजी बाल महोत्सवाचे उद्घाटन झाले. उद्घाटनाला अहमदनगर बालकल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ,बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा ऍड. नंदनवार, बाल कल्याण समितीच्या सदस्या रोहिणी खोळदकर, महिला बाल कल्याण विकास अधिकारी मनोज ससे, जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, बालविकास प्रकल्प अधिकारी वैभव देशमुख तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात धावणे, गोळा फेक, थाळी फेक, कब्बडी, खोखो, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,गायन एकल व सामुहिक,एकल नृत्य, सामूहिक नृत्य इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. मैदानी खेळ महिला मंडळ संचलित निराधार बालकाश्रम मैदानावर घेण्यात आल्या.
शेवटच्या दिवशी १८ जानेवारी समारोप व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्नेहालय चाईल्ड लाईन जिल्हा बाल कक्ष, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.हा जिल्ह्यातील सर्वात मोठा बालमहोत्सव ठरला. रावसाहेब झावरे सर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण कराळे, विनायक आव्हाड, डॉ अरुण इथापे, रविंद्र हसे जिल्हा बाल विकास कक्षाचे प्रशांत गायकवाड, प्रकाश वाघ, महेश सुर्यवंशी व आदर्श ग्रामीण महिला मंडळाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
मुलांसाठी चाचा नेहरू बाल मोहोत्सव अत्यंत उपयुक्त : चंद्रशेखर पगारे, टाकळी ढोकेश्वर येथील चाचा नेहरू बाल महोत्सवाचे बक्षीस वितरण व समारोप

0Share
Leave a reply