बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील लोहगांव सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष राजेंद्र भुमन्ना तोटावाड रेड्डी लोहगांवकर तर व्हाईस चेअरमन पदी भगवान सटवाजी पा.कानोले जिगळेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यावेळी संभाजी पाटील बुढे, माजी चेअरमन, शंकरराव रेड्डी मा.उपसरपंच, बालाजी देशमुख माजी चेअरमन, बालाजी शेटकर व्हा. चेअरमन, दत्ता नंदी मुरशेटवाड, ग्रा.प. सदस्य, लक्ष्मीकांत बासटवार, ग्रा. प. सदस्य प्रकाश वानोळे, अरुण चौधरी, आपाराव मुस्तापुरे, शंकर येरमवार, विठ्ठल गायकवाड, व्यंकटे पा. मोरे, सुनीताबाई मुरशेटवाड,अनुसयाबाई डुबूकवाड, बालाजी मुरशेटवाड, माजी सरपंच, भिमराव मोडेवाड, उमाजी अनमवाड, दिगांबर काचमोडे, सदाशिव कांबळे, लक्ष्मण मुरशेटवाड, शेख साहेब सचिव आदी संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्यावर गुलालाची उधळण करण्यात आली. व फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
लोहगांव सोसायटी चेअरमन पदी राजेंद्र तोटावाड तर व्हाईस चेअरमन पदी भगवान पा.कानोले यांची बिनविरोध निवड

0Share
Leave a reply