विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर-नेवासे राज्यमार्गावर टाकळीभान शिवारात मंगळवारी सायंकाळी एक दुर्दैवी अपघात घडला. लग्न समारंभातून परतताना एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो वाहनाचे नियंत्रण सुटून ते लिंबाच्या झाडावर धडकले. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दुचाकीस्वार दिगंबर पांडुरंग शिंदे (वय ६५, रा. गुजरवाडी) आणि सातारा येथील जाधवराव कुटुंबातील गोपिका व देवयानी या दोन महिलांचा समावेश आहे. टाकळीभान येथील शिवाजीराव धुमाळ यांच्या मुलाच्या प्रवरासंगम येथील लग्न समारंभातून परतताना ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती अशी की, बोलेरो (एमएच १७ क्यू १७९५) मधून वऱ्हाडी मंडळी परत येत असताना टाकळीभान शिवारातील स्वस्तिक ट्रेंड्रिंग दुकानासमोर दिगंबर शिंदे यांची स्कुटी (एमएच १७ डीबी ९७०७) अचानक समोर आली. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो झाडावर धडकली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या उज्ज्वला इंगळे (६१), जनार्दन जाधवराव (६०), प्रकाश धुमाळ (६०) आणि सुप्रिया धुमाळ (४९) यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सुशील इंगळे (६३) आणि दिलीप जाधवराव (६०) यांना अधिक उपचारांसाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक तरुणांनी तत्काळ मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
श्रीरामपूर-नेवासे मार्गावर भीषण अपघात लग्न समारंभाहून परतताना बोलेरो झाडावर आदळली ; तीन जणांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

0Share
Leave a reply