राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य च्या वतीने आम्ही सावित्रीच्या लेकी, गुणगौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्व पत्रकारांचा सन्मानसोहळा स्नेहपुंज लॉन्स राहुरी, येथे 2/02/2025 रोजी संपन्न होणार असून, या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहील्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.,तसेच आमदार शिवाजीराव कर्डिले, राष्ट्रीय नेत्या महिला आघाडी,रीपाई आठवले च्या सौ.सीमाताई आठवले,आमदार श्री. अमोलजी खताळ पा.,आमदार श्री विठ्ठलराव लंघे पा.,आमदार सौ. मोनिकाताई राजळे, यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास राहणार असून प्रमुख मान्यवर म्हणून राहुरी तहसीलदार श्री नामदेवराव पाटील, राहुरी पोलिस निरीक्षक श्री संजय ठेंगे, नायब तहसीलदार राहुरी सौ.संध्याताई दळवी उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार मूर्ती म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्यस्तरीय पुरस्कार तसेच सावित्रीच्या लेकी म्हणून विविध क्षेत्रातील उल्लखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य च्या संस्थापिका /अध्यक्षा सौ स्नेहलताई सांगळे यांनी दिली आहे
रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आम्ही सावित्रीच्या लेकी, गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

0Share
Leave a reply