राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 23/01/2025 रोजी नामदेव पाटील तहसीलदार राहुरी यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गु र नं 42/ 2025 कलम 336(3) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे लक्ष्मण सोपान दळे वय-39 रा- कुंभार गल्ली राहुरी,ता- राहुरी याला पोलिसांनी त्याचे राहत्या घरून ताब्यात घेऊन दिनांक 24/01/2025 रोजी त्याला अटक केली असून, सदर आरोपीला मा.न्यायालयात हजर करून पाच दिवस पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार विजय नवले हे करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि. अहिल्यानगर,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात , सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते,पोलीस हेड कॉन्स्टेबल- विजय नवले, संदीप ठाणगे, सुरज गायकवाड,राहुल यादव,पोलीस कॉन्स्टेबल-प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे,नदीम शेख नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर यांनी केलेली आहे.
तहसीलदार राहुरी यांचा बनावट गोल शिक्का तयार करून, बनावट कागदपत्रावर सही करून फसवणूक करणाऱ्या इसमास राहुरी पोलिसांनी ठोकल्या 24 तासात बेड्या

0Share
Leave a reply