इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी स्कुल मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष मा. मारुतराव थोरातसर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. बापूराव थोरात सर, संस्थेचे सचिव मा. विजयभैय्या थोरात, खजिनदार संतोष थोरात, सदस्या सौ. संगीताताई थोरात, सदस्य अजय थोरात, सौ. सुशिलाताई थोरात तसेच संस्थेच्या प्राचार्य सौ. वंदना थोरात मॅडम व प्राचार्य मोहिते सर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर भिगवण ग्रामपंचायतचे सरपंच दिपीका क्षीरसागर यांच्या उपस्थितीत परेड संचालन करण्यात आले. २६ जानेवारी २०२५ या दिवशी स्कूलमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन या विषयावर भाषण केली. देशभक्तीपर गीत गायन केले. मुलीनी नृत्य सादर केले. प्रजासत्ताक दिनास भिगवण गावचे पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ, पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भोसले सर,भाट सर यांनी केले.तर आभार रेश्मा लोहार मॅडम यांनी मानले. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव यशस्वी होण्यासाठी संस्थेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित, विठ्ठलराव इंग्लिश मेडियम स्कूल & ज्यु. कॉलेज व आय टी आय भिगवण येथे ७६ वा प्रजासत्ताक दिना उत्साहात साजरा

0Share
Leave a reply