प्रतिनिधी /आर.आर.जाधव : राहुरी तालुक्यातील वरवंडी (खडकवाडी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण जेष्ठ पत्रकार आर आर जाधव यांचे हस्ते करण्यात आले त्यानंतर इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला शाळेचे मुख्याध्यापक संजय राऊत सर व शिक्षीका श्रीमती राऊत मॅडम बालम भाई शेख , यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोज केले होते य मुळा धरणग्रस कृती समितीचे कोडीराम बाचकर यानी कार्यकमाचे अध्यक्ष स्थान भुषविले.
या वेळी रामभाऊ शिंगाडे , रामनाथ कोळेकर शिवाजी शिंगाडे , सागर पवार , लक्ष्मण बरे ,राघु येळे . भास्कर काळे राजु शिंगाडे आणणा काळे ,आदिसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर दुसरीकडे गाडगे महाराज अश्रम शाळा वरवंडी येथेही ध्वजवंदनचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थी विद्यार्थीनीचे देशभक्ती पर गीते , व भाषणे झाली. जिल्ह्यातील अश्रमशाळांच्या जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा पार पडल्या त्या मध्ये वरवंडी अश्रम शाळेच्या विद्यार्थ्यानी नैपुण्यपूर्ण यश संपादन करून द्वितीय पुरस्कार मिळवाला त्याच प्रमाणे शालेय स्थरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याना जेठ पत्रकार आर आर जाधव प्राथमिक विभागाच्या मुख्याद्यापीका श्रीमती घावटे मॅडम व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गमे सर यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या वेळी गावचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर राजेंद्र पवार शाळेचे शिक्षक शिक्षीकेतर कर्चारी पालक उपस्थीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री भगत सर यांनी केले
Homeशिक्षण विषयीवरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडगे महाराज अश्रम शाळा वरवंडी येथे प्रजासत्तक दिन उत्साहात साजरा
वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडगे महाराज अश्रम शाळा वरवंडी येथे प्रजासत्तक दिन उत्साहात साजरा

0Share
Leave a reply