इंदापूर प्रतिनीधी / प्रवीण वाघमोडे : 26 जानेवारी 2025 : आज ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खडकी येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे स्वयं-प्रेरणा या संस्थेचे संस्थापक, लेखक , प्रवचन कार, प्रेरणादायी वक्ते, सामाजिक कार्यकर्ते दिनेश आदलिंग सर यांचे सकाळी आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व संस्थेच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व झेंडा गीत झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड, संचालिका रोहिणी गायकवाड, सचिव ऋषिकेश गायकवाड, खजिनदार तुषार काळे,उपाध्यक्ष तेजस गायकवाड, स्कूलचे प्राचार्य बाबू सांगळे, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी परेड करून तिरंग्याला सलामी दिली. यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार व संस्थेच्या सर्व मान्यवरांचे सत्कार झाले. आजच्या कार्यक्रमात स्कूलने वर्षभरात घेतलेली ब्राईट फ्युचर टॅलेंट सर्च परीक्षा, खेळांच्या स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार प्रमुख पाहुणे व संस्थेचे मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तसेच भारताचे संविधान व महत्त्व यावर आधारित इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनी एक नाटिका सादर केली.
आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे दिनेश आदलिंग सर यांचे प्रेरणादायी भाषण झाले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व बलिदान दिलेल्या देशभक्तांचा अगदी अंगावर शहारा आणणारा इतिहास सांगितला व विद्यार्थी व पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष गायकवाड सर, स्कूलचे प्राचार्य सांगळे सर, शिक्षिका काळभोर मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला याचे मानकरी शिक्षिका सौ. वैशाली बालगुडे मॅडम ठरल्या. आलेल्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे, पालकांचे सर्वांचे आभार मानून वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा यशस्वी होण्यासाठी स्कूलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडीयम स्कूल & ज्यु. कॉलेजमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0Share
Leave a reply