दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दि.३० मा.आमदार श्री बच्चुभाऊ कडूसाहेब यांच्या प्रेरणेने श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट पुणे व जालिंदर दिवेकर यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील 45 दिव्यांगांना, श्रवण यंत्र, जयपुर फुट. हात, कॅलिपर, काठी, कुबड्या, व्हिलचेअर, आधी वस्तू गरजू दिव्यांग यांना वाटप करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष , श्री धर्मेंद्रजी सातव साहेब उपस्थित होते. त्यांची महाराष्ट्र प्रहार संघटने प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून सर्वांनी त्यांची अभिनंदन केले त्यावेळी उपस्थितीमध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अनिकेत सर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते श्री जालिंदर दिवेकर बाप्पू कोपनर गोरख पाचपुते मच्छिंद्र शेंडगे, निंबाळकर अनिल शिंदे संतोष फरगडे, बाळासाहेब शिंदे, अतुल रायसोनी, शांतीलाल सुतार, दतू गाढवे, सुधीर लोखंडे, यावेळी धर्मेंद्रजी सातव यांनी जालिंदर भाऊ दिवेकर यांचे विशेष कौतुक केले व जालिंदर भाऊंची दिव्यांगा प्रति असलेली निष्ठा, तळमळ, त्यांनी केलेले कार्याचा आदर्श इतर दिव्यांग प्रतिनिधींनी घ्यावा असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी सातव साहेबांनी दिव्यांग बांधवांना घरकुलासाठी गायरानातील जागा मिळण्याचा विषय मार्गी लावल्याचे आवर्जून सांगितले ,दिव्यांग बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे वेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे दौंड तालुक्यातील 45 दिव्यांगांना विविध गरजू वस्तूंचे वाटप

0Share
Leave a reply