दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दिनांक 31/ 1/2025 रोजी दिव्यांग विकास फाउंडेशनने राबविला विशेष कार्यक्रम राबविण्यात आला. सर्व दिव्यांग बंधू-भगिनींचे तसेच विधवा व निराधार महिलांची संजय गांधी व श्रावण बाळ आधार कार्ड व मोबाईल नंबर अपडेट करण्यात आले उपस्थितीमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे समितीचे व्यवस्थापक श्री वाघमारे साहेब सकाळी १० वाजता त्यांच्या नियोजित वेळेत दाखल झाले, विकास फाउंडेशन प्रणित दिव्यांग हक्क घर्ष समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाबासाहेब जगताप तालुका अध्यक्ष बाळासाहेब प्रहार संपर्कप्रमुख तालुका जालिंदर दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी 300 लोकांनी याचा लाभ घेतला विशेष सहकार्य शिवाजी दिवेकर पाटील व मच्छिंद्र दादा दिवेकर यांची मिळाले त्यावेळी हेही उपस्थित होते व इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जालिंदर भाऊ दिवेकर, बाबासाहेब जगताप, बाळासाहेब नानवर, व इतर दिव्यांग बांधवांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.
Leave a reply